भंग का रंग जमा हो चकाचक...

वाटते तो सन १९८४-८५ चा काळ असावा...

ती होती जनकपुरी दिल्लीच्या होळीची मजा. त्यावेळी मी हवाईदलातील वेस्टर्न कमांडच्या पोस्टींगवर होतो. कॅम्पात घर मिळायला फार वेळ लागे म्हणून आम्ही एका भाड्याच्या बंगल्यात राहात होतो. जनकपुरीतील सी-२ ब्लॉक मधील 'दत्त-विनायक मंदिर,'  तेथील मराठी लोकांसाठी एक सांस्कृतिक व धार्मिक आकर्षणाचे केंद्र होते. मंदिराचे पुजारी उत्तर भारताच्या भागातून आलेले मराठी असल्याने महाशिवरात्री नंतर होळी पर्यंत भांगेचा गोळा तयार करायला ते लागत व मोजक्या लोकांसाठी भांग घोटून सेवनाचा कार्यक्रम साजरा होत असे.

अशाच एका होळीला.... सर्वांना गायनाचा मूड आला होता. ४-६ जणांनी मराठी फिल्मी गाण्यांनी सुरवात केली व होता होता भावगीते, गझला कव्वाल्यांनी पेटीवरल्या बोटांनी सुरांशी जमवून घ्यायला सुरवात केली ..

.. अस्मादिकांना गोळी तुफान चढली. त्यातच ईमरती व अन्य गोडधोड पदार्थांनी जरा जादाच चढली... बाहेर रंगांची रंगारंग धमाल चालली होती. मंदिराच्या आवारात आम्ही गाणी म्हणता म्हणता... इतरांना रंगांनी रंगवत, 'होली है' म्हणतानाची रंगत भांगेच्या प्रभावाने उत्साही होत होती...

घरात आलो ते, ’घेई छंद मकरंद म्हणतच.’  मग ...'सर्वात्मका सर्वेश्वरा'... नाट्यगीतातील खोल अर्थ कळल्याची अनुभूती झाली. मधुरगीते स्टीरिओवर फुल आवाज करून ऐकताना पोरे भांबावली...

कहर तर नंतर झाला.  म्हणजे मावळणकर हॉलमधील पुल व सुनीताबाईंचा - बोरकरांच्या कविता - गायनाचा आस्वाद लुटायला त्या तंद्रीतच मी २०-२२ किमी कधी पोचलो व परतलो कळले नाही. त्यावेळी प्रेक्षकातून फक्त माझी 'वा-वा', - 'बहोत खूब' - ची दाद फार दणक्यात गुंजत होती असे भासत होते. तो असर पुढे दोन दिवस होता. आनंदाचा माझा तो मूड पाहून सौ. अलकाने ठरवले की आपण एक भांगेची पार्टी करू या. झाले ठरले...उत्साही साने कुटुंबिय त्यांच्या दोन मुलांसह, परांजपेद्वय, आमच्याकडील चिन्मय व नेहा व आम्ही दोघे. आमच्या घरात घाट घातला गेला. वाटण-घाटण करत करत दुपारचे १२ वाजले. मुलांना ठंडाईचे गिलास हाती दिले. खसखस घातलेली ठंडाई मुलांना चढली. ती घरभर २-३ तास लपाछपीच्या खेळात रंगली. दुपारचे रणरणते ऊन. त्यात 'चियर्स' करून भांगेचे ग्लास फस्त करून अलका व मृणाल एकदम तर्र झाल्या. लवकर घरी जातो म्हणून परांजपे लगबगीने सटकले.

’काय मज्जा येतेय' करता करता गरगरायला लागले. भिती वाटायला लागली. . दोघींनी बेडवरून आरोळ्या मारायला सुरवात केली.

'आता आम्ही चाललो ...वर... मुलांना साभाळा'

'आता काही परतत नाही'. त्या जणू आकाशात १०० फूट तरंगत होत्या असे त्यांना होत होते.

'अहो मुलांचा नीट साभाळ कराल ना'. अशा हाका येऊ लागल्या. साने, पतंग जसा मांजाने खेचतात तसे हातवारे करत, काही काळजी करू नका. आम्ही आमचे बघून घेऊ. तुमच्या पश्चात.'  असे चेष्टेनी खिजवत होते.

एकमेकींना गळ्याची शप्पत घालून पुन्हा भांगेच्या वाटेला न जाण्याच्या अनेक आणाभाका झाल्या. साने एका बेडवर जे आडवे झाले ते घोरत लंबेलाट.  मीच तो काय जसा सावरलेला होतो.  मला ब्रह्मांड आठवले. कारण दुसर्‍यादिवशी ऑफिसमधे माझे मोठे प्रेझेंटेशन होते. त्यात गफलत होणे म्हणजे प्रमोशनवर गदा असा पेच होता.सारखी घड्याळाकडे नजर जाऊ लागली. बराच वेळ झाला असे वाटून पुन्हा पहावे तर सेकंदाचा काटा फक्त ५-६ सेकंद सरकला होता असे वाटू लागले. मनावरचा ताबा सुटण्याच्या आत काही हालचाल केली तर निभाव वागेल असे वाटून घाम फुटला. वेळीच सावधपणे कोणालातरी सांगून वैद्यकीय मदत मागवण्याची व्यवस्था करावी असे वाटून मी तडक पायात चप्पल अडकवली व आमच्या घरासमोर वरच्या मजल्यावर राहणार्‍या विंग कमांडर बाबूकडे गेलो.'टींग-टाँग' 'टींग-टाँग' करत दारावर बेल वाजतच राहिली.

'क्या है?' करत लुंगीत बाबूसाहेबांनी मला पाहिले.  असा अचानक न सांगता कसा?.. असा त्याच्या चेहर्‍यावरील भाव ओळखत मी त्याला सारी कल्पना दिली. त्यालाही चढली आहे असा मला उगीचच भास झाला.  मलाही चढलेली आहे असे मी आवर्जून सांगितले.

'नो प्रॉबलेम, डोंट वरी,'  असा सिनियारिटीचा आव आणत त्याने मला घसघशीत धीर दिला.
’मी इथे असताना काही चिंता नको' असे त्याने तोंडभर आश्वासन दिले आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला.

'ओके, ओके' करत मी घरात परतलो. घराचा दरवाजा धाडकन बंद होताना बाबूच्या तोंडावर आपटला. मी सटपटलो. 'माझ्या दारात तु इथे कसा' असे मी म्हटले.

तो तोंडावर बोट ठेऊन म्हणाला, 'रेकी करायला आलो. कितपत सीरियस मामला आहे.'
महाशयाचा मूड काही और वाटला...


'ओके ओके' करत तो परतला. रस्ता ओलांडून वरच्या मजल्यावर पोचला. त्याने घराचा दरवाजा बंद करायला व मी त्याच्या पाठीला धक्का द्यायला एकच गाठ पडली.

'तू क्याकर कहा है?' आता त्याची चकीत व्हायची वेळ होती.

'मेरी चप्पल..' करत मी आत गेलो. तो त्याच वेळी एक जण सोफ्याच्या खालून बाहेर येत होता. मी डोळे विस्फारून म्हणालो, 'ये कौन? यहा क्या कर रहे है?

हातात रंगित पाण्याची बाटली धरलेल्याकडे पहात, कडवट तोंड करत बाबू म्हणाला, 'मीट माय हाऊस ओनर'.
पंत चांगलेच तरंगत होते.

'ओके, ओके' करत मी काढता पाय घेतला.दोघीना अती होऊन झोप लागली. मुलांचे पाय सारखे सारखे तिसर्‍या मजल्यापर्यंत
धावून धावून थकले. मी विंग कमांडर बाबूच्या कडील प्रकार पाहून चक्रावून गेलो व अती श्रमाने पेंगुळलो.

असेच काही तास गेले. मुलांना अती तहान लागली म्हणून त्यांनी फ्रिज मधील बाटल्याच्या बाटल्या फस्त केल्या. संध्याकाळी दूरदर्शनवर 'जंगली' सिनेमा चालू झाला.

'चाहे कोई मुझे जंगली कहे' म्हणून 'याऽऽऽऽहू....' अशी मोठ्याने आरोळी ठोकावीशी वाटली. तो दिवस धुंदीचा मस्तीचा होता.

विंग कमांडर बाबू त्याच्या घरमालकाबरोबर पकडला गेला म्हणून त्यानेही माझ्या भांग प्रकरणाची बकबक कुठे केली नाही.  आज होळी विशेषांकासाठी हे लिहिताना एका मजेशीर भांग-प्रकरणाची लज्जत पुन्हा अनुभवता आली.


लेखक: शशिकांत ओक

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

हीहाहा

मी पन एकदा भांग घेत्ली व्हती.
रातभर हासत हुतो. शेवटी बापाने एक कानफटीत वाजवली. तवा कुटं हासायचा थांबलो आनि मंग निसता रडत बसलो.

बाबुराव

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

ओक साहेब, लेख छान आहे. भांगेच्या तारेत असे प्रकार घडतात हे बरंच ऐकून आहे त्यामुळे याच्या वाटे कधी गेले नाही. आमच्या शेजारचे उत्तर प्रदेशी कुटुंब दरवर्षी भांग खाण्याचा आग्रह करत असे पण ते आम्ही टाळलेच. तुम्ही वापरलेला ’घसघशीत धीर’ हा शब्दप्रयोग आवडला.

सुधीर कांदळकर म्हणाले...

मस्त मजा आली. माझा मोठा भाऊ एकदां होळीच्या दिवशीं भांग प्याला. दादरच्या त्या टोळक्याला अचानक शहाळीं खायची हुक्की आली. मग हा आणि एक मुलगा असे दोघेजण बाजूच्या माडावर चढले. पण ते माडावरच बसले आणि किती कोणी बोलावलें तरी खालीं उतरेनात. रात्री साडेअकराला चढलेले दोघेजण सकाळीं साडेसातला उतरले आणि आपापल्या घरीं जाऊन झोपून गेले. दुसरे दिवशीं तीनपर्यंत हा उठेना, भांग प्याला हे फक्त मला ठाऊक होते, घरी सांगितले तर तीर्थरूपांनीं फटके दिले असते. समोरच्या मित्राचे वडील डॉक्टर होते. त्यांना आणले. त्या चतुर डॉक्टरांनीं बी कॉम्प्लेक्सचें इंजेक्षन दिलें आणि औषध घ्यायला कोणाला तरी पाठवा म्हणाले. मीच गेलों. कसल्यातरी निरुपद्रवी गोळ्या दिल्या आणि मला म्हणाले कीं त्यानें कसली तरी नशा केली आहे, काळजी करू नका, थोड्यावेळाने उठेल. मी नशेचा भाग वगळून सांगितलें. संध्याकाळीं तो उठेपर्यंत घरातल्यांच्या तोंडचें पाणी पळालें होतें. रात्रभर तो माडावर होता व भांग प्याला होता हे अजूनहि घरांत कळलें नाहीं.

partheniequakenbush म्हणाले...

Blackjack table with blackjack table with blackjack table with blackjack table with blackjack table
The dealer 영주 출장샵 throws a card into the slot and offers 안성 출장안마 blackjack. The dealer places the card into the blackjack table, and if it loses, 논산 출장샵 it's 문경 출장샵 still 대구광역 출장마사지