संपादकीय!

नमस्कार मंडळी. हिवाळी अंक ’शब्दगाऽऽरवा’ नंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत..
होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा .’ :D
रोजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण निखळ आनंदाचे असावेत म्हणून हा उपक्रम.
ह्या अंकाचा विषय आम्ही निखळ विनोद असा ठेवलेला आहे. ह्यामध्ये उपहास, फिरकी, फजिती वगैरे वगैरे विनोदाचे विविध रंग आपल्याला वाचायला मिळणार आहेत. तसेच मुखपृष्ठावर आमचे एक तरूण व्यंगचित्रकार मित्र श्री. मीनानाथ धस्के ह्यांच्या कुंचल्यातून उतरलेले एक मार्मिक चित्र आम्ही देत आहोत. इथूनच आपली हास्ययात्रा सुरु होणार आहे.

करूण कहाणी ऐकवून रडवण्यापेक्षा, विनोद करून लोकांना हसवणे किती कठीण असते हे ह्या निमित्ताने समोर आलेले एक ढळढळीत वास्तव आहे.
त्यामुळेच आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतांना बहुतेक सिद्धहस्त लेखकांनी असे काही लिखाण जमत नसल्याची प्रत्यक्ष कबूली दिली आणि ह्या अंकाला मिळालेल्या मर्यादित प्रतिसादाने त्यावर शिक्कामोर्तब झाले असे म्हणता येईल. तरीही आम्ही आपल्याला हसवण्याचा विडा उचललेला आहे; त्यात आम्ही कितपत यशस्वी झालोय हे आपणच सांगा.

आमच्या अंकातील लेख, कथा वाचून आपल्या  चेहर्‍यावर एक जरी स्मितरेषा उमटली तरी आम्ही आमच्या कामगिरीत यशस्वी झालो असे समजू.  :)
आणि समजा,समजा बरं का... आमचा हा प्रयत्न आपल्याला अगदीच ’हास्यास्पद’ वाटला तरीही आम्ही यशस्वी झालो असे समजू.  ;) 
कारण, कसेही करून आपल्या चेहर्‍यावर हसू फुलवणे हे आमचे ब्रीद आहे आणि ते आम्ही फुलवणारच.  :)

तेव्हा आता वाचा आणि हसा....हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ

होळीच्या सर्व रसिक वाचकांना रंगीबेरंगी शुभेच्छा.


विशेष निवेदन: ह्या अंकातल्या लेखांमधील सर्व चित्रे महाजालावरून साभार.

१० टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काका, सर्वप्रथम तुमचं आणि श्रेयाचं अभिनंदन! तुमच्या दोघांच्या मेहनतीमुळे हा अंक आकाराला आला. स्क्रिब्ड वर अंक वाचता येत होता पण प्रत्येक लेखासाठी प्रतिक्रिया कुठे द्यावी हे समजत नव्हतं. इथे लेख वाचणं अगदी सोपं होतंय. सर्व लेख वाचून प्रतिक्रिया देईनच. तुम्हालाही होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

अनामित म्हणाले...

अंक प्रथमदर्शनी बहारदार दिसतोय. आता वरवर चाळलाय. नंतर वाचून सविस्तर प्रतिसाद देईनच. लेखकांमध्ये नामांकितांचा भरणा असल्यामुळे अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत.


कौस्तुभ

अनामित म्हणाले...

अंक एकदम रद्दड आहे. ही असली नाटकं आता बास करा . उगाच स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी असले फालतू उद्योग आता पुरे करा हो. म्हातारपणात ही थेरं शोभत नाहीत तुम्हाला बरं का अत्यानंद.
मायला सगळाच आनंदी आनंद आहे इथे. अहो रुपम अहो ध्वनी.

स्पष्टवक्ता

अनामित म्हणाले...

नमस्कार अत्यानंदजी. कुणाला पार्श्वाग्नि व्हावा हीच तुमच्या तळपत्या यशाची पावती आहे. ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनीं स्लेजिंग सुरू केले की व्हीव रिचर्डसला गुदगुल्या होत असत. आतां त्यांना कळून चुकले कीं मी त्यांच्यापेक्षा थोर आहे म्हणून.

प्रमोद देव म्हणाले...

कांचन आणि कौस्तुभ धन्यवाद.

स्पष्टवक्तासाहेब, अहो तुमची काय अडचण आहे?
का इतके चिडताय? आमचा अंक पाहून आपला रक्तदाब इतका का वाढला? बरं नसतं ते प्रकृतीला.
आता जरा आपला पूर्वग्रह बाजूला ठेवून अंक वाचा...पाहा वाचल्यानंतर आपोआप गोळ्या न घेता तुमचा रक्तदाब पूर्ववत सामान्य स्थितीत येईल.

सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. होळीचा हास्यफराळ आवडला.

Unknown म्हणाले...

एकतर विनोद मला फारसे कळत नाही. त्यात हसायचे कुठे हे मार खाउनही समजले नाही. पण मला मार बसल्याने काही जण मात्र जरूर हसले. तेव्हा पासून मला विनोद हा विषय गणीता सारखाच एक कोडे वाटला. ह्या अंकाचे असेच काहीसे वाटले.

मदनबाण म्हणाले...

हास्य अंकाची कल्पना आवडली...या अंकासाठी स्वतःचा अमुल्य वेळ खर्च करुन लेख लिहणार्‍या आणि या अंकाची मांडणी करणार्‍या सर्वांचे अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

देव साहेब, अंक चाळला. निवांतपणे वाचतो.
आणि वाचल्यावर कुठे तरी लेखनावर दोन शब्द भले बुरे खरडतो. :)

अनामित म्हणाले...

सुंदर आहे अंक. रंगसंगती आल्हाददायक आहेच पण अंकातले लेखनही छान आहे. कांदळकर,घारेंसारखे दिग्गज लेखकांचे लेखही त्यांच्या लौकिकाला साजेसेच आहेत.

रविराज पोंक्षे